जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता व्यवसाय नियोजन स्पर्धा अर्थात ‘बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य, शेती, पर्यावरण, पर्यटन, सायबर सुरक्षा, शिक्षण व कौशल्य, प्रशासन व इतर विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना या स्पर्धेत मांडता येणार आहेत. त्या १७ व १८ मार्च रोजीच्या प्रदर्शनामध्ये ठेवल्या जातील. तरुण संशोधक, वरिष्ठ संशोधक व तज्ज्ञ संशोधक अशा तीन गटात ही स्पर्धा विभागली जाणार आहे.
तरुण संशोधक गटातील १० विजेत्यांना २ लाख ७५ हजार रुपये, वरिष्ठ संशोधक गटातील ५ विजेत्यांना १ लाख ५ हजार रुपये व तज्ज्ञ संशोधक गटातील ५ विजेत्यांना २ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ मार्च २०२१ रोजी होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवकांनी सहभागी होऊन नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.