लोणी बु. ग्राम पंचायतीमध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेचा मागील बऱ्याच वर्षांपासून कर भरला नसल्याने अनेकांकडे हजारो रुपये कर प्रलंबित आहे. नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांनी आजच्या सभेमध्ये ज्या नागरिकांना ग्राम पंचायतीच्या सोयी सुविधा आवश्यक आहेत, त्यांना टॅक्स भरणे अनिवार्य करून त्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचे दाखले, नाहरकत आता मिळणार नाहीत. तसेच ग्रामपंचायतीमधील दक्षता समिती मागील अनेक वर्षांपासून बदलली नसल्याने समितीमध्ये कोणते नागरिक आहेत, याबाबत कुणालाही माहिती नसल्याने दक्षता समिती बदलाबाबतचाही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्राम पंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन आलेल्या उत्पन्नातून नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी ग्राम पंचायत कटिबद्ध असल्याचे सरपंच सविता बोडखे, ग्राम पंचायत सचिव प्रल्हाद घुगे यांनी सर्व सदस्यांच्या उपस्थित ठराव मंजूर केले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य अरविंद इंगोले, भास्कर नरवाडे, राजू चौगुले, विनोद बोडखे, नीलेश बोडखे, रामेश्वर टकले, वामन नलनकर, कपिल तुरेराव, संदीप पारवे, संतोष खेळबाडे, समाधान बोडखे, विजय बोडखे, प्रकाश पारवे आदी सदस्य उपस्थित होते.
लोणी बु. ग्राम पंचायतीमध्ये विविध प्रकारचे ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:28 AM