------------------
कारंजा बाजार समितीत शनिवारीही खरेदी
वाशिम : कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी- विक्रीचे व्यवहार शनिवार, दि.२ जुलै रोजीही खरेदीचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. बाजार समितीच्या संचालकांनी सर्व अडते, व्यापारी व हमालबांधवांना आधीच याची सूचना देण्यात आली होती.
------------------
इंझोरी येथील पथदिवे दुरुस्तीची मागणी
इंझोरी : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
------------------
महावितरणची मान्सूनपूर्व कामे प्रलंबित
वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली; परंतु २ जुलैपर्यंतही अनेक गावांतील लोंबकळत्या तारा आणि वाकलेले वीज खांब दुरुस्त होऊ शकले नाहीत.
------------------
वन्यप्राण्यांमुळे पीक संकटात
वाशिम : बांबर्डा परिसरातील ९० टक्क्यांवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली असून, या पिकांचे अंकुरही वर आले आहेत. आधीच अनियमित पावसाने हे पीक सुकण्याच्या स्थितीत असतानाच आता वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडले आहे.
------------------
वाशिम-पुसद महामार्गाची दैना
वाशिम : वाशिम ते पुसद महामार्गावरील जांभरूण जहाँगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे.