प्रवासी निवारा उभारण्याची गरज
वाशिम : येथील अकोला नाक्यावर एसटीचा थांबा आहे; पण प्रवासी निवारा नाही. तेथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन अकोला नाक्यावर सुसज्ज प्रवासी निवारा उभारण्याची मागणी योगेश उबाळे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. चक्क रस्त्यावरच प्रवासी, नागरिकांना उभे राहावे लागत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी
वाशिम : पोलीस विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने शेलूबाजार येथे विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक चौकातील पोलीस पॉइंटवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामुळे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दुपारी दाेननंतर ही कारवाई केली जात आहे.
जऊळका परिसरात स्वच्छतेचा बोजवारा
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. यंदा नागरिक मोठ्या संख्येने उघड्यावर शौचास जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.