३२७३ शेतकरी: चांगल्या दराचा होणार फायदालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत सोयाबीन पेरणी केलेल्या ३२७३ शेतकºयांकडून यंदा २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. उगवण क्षमता तपासणीनंतर प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकºयांना महाबीजकडून मोबदला दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाबीजसाठी शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली होती. जिल्हाभरातील ३२७३ शेतकºयांनी महाबीजसाठी सोयाबीन उत्पादित केले. यंदा सोयाबीनसाठी थोडे पोषक वातावरण राहिल्याने बिजोत्पादक शेतकºयांना त्याचा चांगला फायदा झाला आणि सोयाबीनचा दर्जा चांगला राहिला. आता गत महिन्यातच जिल्हाभरातील सोयाबीनची काढणीही उरकली आणि सोयाबीनची खरेदीही सुरू झाली. यात महाबीजसाठी बिजोत्पादन करणाºया ३२७३ शेतकºयांकडून तब्बल २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करून घेण्यात आले आहे. या खरेदीपोटी शेतकºयांना मोबदला म्हणून ठरलेल्या प्रमाणानुसार अग्रीम राशी देण्यात आली आहे. तथापि, बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतर शेतकºयांना निर्धारित किमतीनुसार मोबदला दिला जातो. त्यासाठी १ डिसेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान बाजारातील सर्वोच्च दराची सरासरी काढून त्या सरासरी दराच्या २५ टक्के रक्कम मिळवून शेतकºयांच्या सोयाबीनचे दर महाबीजकडून निश्चित केले जातात. सद्यस्थितीत बाजारात सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा अधिक दराने होत असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत बाजारातील दर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने यंदा महाबीजसाठी सोयाबीन उत्पादित करणाºया शेतकºयांना चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे महाबीजच्या बिजोत्पादकांत उत्साहाचे वातावरण आहे.
बिजोत्पादकाकडून २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:28 PM