लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर कारंजा येथे १३ मे पासून नाफेडची तूर खरेदी सुरू झाली. सुरूवातीपासून ते १५ मे रोजी दुपारपर्यंत ४५ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.यावर्षी तूरीेचे उ्त्पादन बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले. मात्र, शासनाकडून तुरीला समाधानकारक हमीभाव नसल्याने आणि बाजारभावानुसार तूरीची खरेदी होण्याची कोणतीही हमी नसल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. नाफेड केंद्रावर तूरीला हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी आणली. मात्र, मध्यंतरी शासनाने अचानक नाफेड केंद्रांवर तूरीची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. त्यानंतर राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आता ३१ मे २०१७ पर्यंत नाफेडमार्फत मार्केटींग फेडरेशनकडून तूर खरेदी केली जाणार आहे. शासकीय दरात तूरीची विक्री व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी कारंजा येथील नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांना ‘टोकन’ घेता येणार आहे. टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर शासकीय खरेदी केंद्राद्वारे खरेदी केली जाणार आहे.
कारंजा येथे ४५ हजार क्विंटल तूर खरेदी
By admin | Published: May 16, 2017 1:43 AM