लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : नाफेड केंद्रांमार्फत शेतक-यांच्या सोयाबीन व कापसाची शासनाने खरेदी करावी अशी मागणी २३ रोजी शिवसेनेचेवतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनात नमुद आहे की, विदर्भात शेतक-यांची शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबुन आहे. यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने शेतक-यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकीकडे उत्पादन घटले, असतांना बाजारपेठेत पिकांना अल्प दर आहे. निवडणुकीपुर्वी आपण शेतक-यांना उत्पन्न मुल्यासोबत ५० टक्के नफा देणयाचे आश्वासन दिले होते, परंतु ते शक्य नसल्यास नाफेड केंद्रामार्फत त्वरित कापुस व सोयाबीनची खरेदी सुरु करावी व शेतकºयांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली ओह.
नाफेड अंतर्गत सोयाबीन व कापुस खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 7:27 PM
मंगरुळपीर : नाफेड केंद्रांमार्फत शेतक-यांच्या सोयाबीन व कापसाची शासनाने खरेदी करावी अशी मागणी २३ रोजी शिवसेनेचेवतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : जिल्हाधिका-यांना निवेदन