शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘कोरोना’मुळे पोहरादेवी येथील रामनवमीची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 1:36 PM

जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दरवर्षी रामनवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. यावर्षी ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २ एप्रिल २०२० रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १३ मार्च रोजी झालेल्या जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले. बैठकीला जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार सुनील चव्हाण, उमरी खु.चे सरपंच क. भा. पवार यांच्यासह बंजारा समाजाचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. पोहरादेवी येथे देशभरातून लाखो लोक येतात. सध्या काही राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी यावर्षी रामनवमीला आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करावा. यात्रा रद्द करण्यात आल्याने यावर्षी पोहरादेवी येथे येवून नये. याबाबतचा संदेश देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे प्रतिनिधी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी यावेळी केले. २ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार रद्द करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी देवस्थानचे महंत, विश्वस्त व बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांना केले. जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सुध्दा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका उपस्थितांच्या लक्षात आणून दिला.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस