कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शिका म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. संगीता सारडा यांनी गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सरची लक्षणासह इतर माहिती विशद केली. निमा अध्यक्ष डाॅ. मंजुश्री जांभरुणकर यांनी कर्कराेगाची लक्षणे ओळखून लवकरात लवकर औषधाेपचार चालू केला तर कर्कराेगाला बळी पडणारे जीव वाचविता येतात, असे सांगून प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यावी यावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला बालकल्याण समिती सदस्या अरुणा ताजणे, निमा फाेरम सदस्या डाॅ. वैशाली चाैधरी, काेषाध्यक्षा डाॅ. जागृती आंबेकर आदी मान्यवरांची उपस्थिती हाेती. तसेच पंचशीला कांबळे, पल्लवी इंगाेले, मनीषा वंजारे, जनाबाई जैताडे, साेनू भाेयर, लीला इंगाेले, शाेभा खडसे, कल्पना घुगे, आशा जैताडे, वंदना हेम्बाडे, शीतल इंगाेले, सुनीता आडे, लीला इंगाेले, ज्याेती फुलउंबरकर, पूजा महल्ले, संगीता बेले यांच्यासह गव्हाणकर नगरातील महिलांची उपस्थिती लाभली हाेती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवानिवृत्त परिचारिका शकुंतला वंजारे यांनी केले.
मैत्रेय व निमा महिला शाखेतर्फे कर्कराेग जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:42 AM