................
वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थ त्रस्त
जउळका : गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. महावितरणने याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी राजेश काळे यांनी महावितरण कंपनीकडे निवेदनाव्दारे केली आहे.
............
बसफेरीसाठी ग्रामस्थ आक्रमक
शेलुबाजार : गेल्या दीड वर्षापासून मंगरुळपीर आगाराकडून धानोरा-चेहेल मार्गे कोठारी-कवठळ ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना अडचणी येत असून, ही बसफेरी सुरू करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले.
............
आरोग्यवर्धिनी केंद्रात मार्गदर्शन
धनज बु.: येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात शनिवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘कोरोना’विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यात डॉक्टरांनी कोरोनाला घाबरून न जाता काळजी घ्या, असे आवाहन उपस्थितांना केले.
............
तीन दिवसांपासून वीजपुरवठ्यात व्यत्यय
कारंजा : गत तीन दिवसांपासून उंबर्डा बाजार परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे बहरात असलेल्या रब्बी पिकांच्या सिंचनात अडचणी येत असल्याने यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रारही केली आहे. परंतु याचा काहीच फायदा न झाल्याने राेष व्यक्त हाेत आहे.