जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगरुळपीर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तालुकाभरातील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीने शेलूबाजार येथील मुख्य चौकात व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. शुक्रवार १२ मार्चपर्यंत १७१ व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १३१ आरटीपीसीआर, तर ४० अॅंटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. अॅंटीजेन टेस्टमध्ये १ जण पॉझिटिव्ह आढळून आला.
तसेच ८ मार्चपासून आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १३० नागरिकांनी लसीकरण करुन घेतले दिवसेंदिवस लसीकरण टोचून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे नागरिकांनी खुल्या मनाने लसीकरण करुन घ्यावे तसेच व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणीला प्रतिसाद द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद भगत, डॉ प्रशांत महाकाळ यांनी केले आहे.