सुनील काकडे/वाशिम : जिल्ह्यातील कारंजा वनपरिक्षेत्रात सन २0१२-१३ व २0१४-१५ या कालावधीत झालेल्या विविध कामांमध्ये तब्बल ३ कोटी ७0 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी लोकमतच्या सलग पाठपुराव्यामुळे संबंधित चौकशी अधिकार्यांनी प्राथमिक चौकशी केली. यासह कारंजाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न लावण्याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांकडे सूचनापत्र पाठविले आहे. वनसंरक्षण, निकृष्ट वनांचे पुनर्विरोपण, निसर्ग पर्यटन, वन्यपशू व निसर्ग संरक्षण तथा वनक्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी सन २0१२-१३ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून कारंजा वनपरिक्षेत्राला सुमारे १0 कोटी रुपये प्राप्त झाले होते; मात्र कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यू.ए.पठाण व त्यांच्या सहकार्यांनी कामे वाटपात तसेच प्रत्यक्ष कामात अनियमितता करुन भ्रष्टाचार केल्याची तक्रार धानोरा (ता. मंगरुळपीर) येथील राजेश वासुदेव चारखोड यांनी २१ एप्रिल २0१४ रोजी उपवनसंरक्षक, अकोला यांच्याकडे सबळ पुराव्यासह केली होती; मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने यासंदर्भात पुन्हा ३ जुलै २0१४ आणि ८ ऑगस्ट २0१४ रोजी तक्रारी झाल्यानंतर मध्यंतरी वाशिम येथील सहायक वनसंरक्षक गांगुर्डे यांनी थातूरमातूर चौकशी केली. सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास वनक्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे या योजनेंतर्गत अनघड दगडी बांधाची कामे करण्यासाठी ५0 लाख रुपयाचा निधी मिळाला होता. या निधीतून मौजे शेंदुरजना, पाळोदी, सावरगाव, पांगरा, मेंद्रा, खापरदरी आदी ठिकाणी अनघड दगडी बांधाची कामे उरकल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले आहे; मात्र यापैकी अध्र्यापेक्षा अधिक कामे न करता न केलेल्या कामांच्या खोट्या नोंदी घेण्यात आल्या. बनावट मजुरांच्या नावे खोट्या पोचपावत्या लिहून तथा बोगस स्वाक्षर्या करून देयके उचलण्यात आली आहेत, असे राजेश चारखोड यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही.गुरमे यांच्याकडे ८ जून रोजी सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले होते.
कारंजा वनपरिक्षेत्र भ्रष्टाचारप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी
By admin | Published: July 07, 2015 1:22 AM