शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:30 AM

वाशिम : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. याकरिता त्यांची गावनिहाय माहिती संकलित करून त्यानुसार सूक्ष्म ...

वाशिम : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. याकरिता त्यांची गावनिहाय माहिती संकलित करून त्यानुसार सूक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची गती वाढविण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ३१ मे रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, संदीप महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार व वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करून यापैकी किती दिव्यांग व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, याची माहिती संकलित करावी. ही कार्यवाही तातडीने करून अद्याप लस न घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. जिल्ह्यातील ज्या गावातील एकाही व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा आजपर्यंत घेतलेली नाही, अशा गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण, कोरोना चाचणी, कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील सद्यस्थिती, म्युकरमायकोसीस, संस्थात्मक विलगीकरण व नव्याने प्राप्त रुग्णवाहिकेबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.

००००००००

चाचण्यांचे प्रमाण कमी होऊ देऊ नका

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी कोरोना चाचणीचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनाधारक यांच्या नियमित कोरोना चाचण्या तसेच ४५ वर्षांवरील दुकानदार, आस्थापनाधारक यांचे लसीकरण करून घ्यावे. ग्रामीण भागात बाधित व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. शहरी भागातसुद्धा संस्थात्मक विलगीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

०००

ग्रामीण भागात लसीकरणाचे नियोजन

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातदेखील जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.