पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी दीपक बाबाराव पाटील यांनी फिर्यादीत असे नमूद केले की, फिर्यादीच्या शेतातील तुरीचे १४ कट्टे घरी जागा नसल्याने हेमेंद्र ठाकरे यांच्या पेट्रोल पंपामागील गोडाऊनमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीत ताडपत्रीने झाकून ठेवले होते. मंगळवार १३ जुलै रोजी फिर्यादीने तेथे जाऊन पाहिले असता १४ कट्टे कमी दिसले. त्यावरून तुरीची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासले असता, दोन दिवसापूर्वी आरोपी वैभव गोपाल राठोड रा. सोमनाथ नगर हा तूर चोरून नेताना दिसला. त्यानंतर बाजार समितीमधील व्यापारी गोलू इंगोले, बरफ राठोड यांना विचारणा केली असता, वैभवने थोडी थोडी तूर त्यांच्याकडे विकल्याचे समजले. त्यामुळे वैभवने राठोड यानेच उभ्या ट्रॉलीमधील तूर चोरी केली, असा पक्का संशय आला. या तुरीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असून आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीने केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीवर कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास बीट जमादार जगन्नाथ घाटे करीत आहेत.
तूर चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:31 AM