गणेशोत्सवादरम्यान शहरातील एका घरासमोरच्या आवारात काही इसम पैशांवर हारजितचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता मंगेश ढोके, गोलू रावेकर, अभिषेक भुजाडे, अभय रामभाऊ, रा. माळीपुरा, तसेच दीपक संघरे, स्वप्निल साटोटे, संदीप रावेकर, सचिन रावेकर, सचिन गोदे, इरफान चौधरी हे ५२ ताश पत्त्यांवर हारजीतचा खेळ करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३१६० रुपये राेख व ५२ ताश पत्ते जप्त करीत जुगार ॲक्टनुसार मंगळवार १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
---------------
कारंजा पोलिसांची गुटखा प्रकरणी दोघांवर कारवाई
७० हजारांचा ऐवज जप्त : गुन्हा दाखल
कारंजा लाड : शहरातील मानोरा रस्त्यावरील दोन युवक दुचाकीने पोत्यात घेऊन जात असलेला ७० हजार रुपये किमतीचा गुटखा कारंजा शहर पोलिसांनी सोमवारी जप्त केला.
भगत वेल्डिंग वर्कशॉपजवळ दोन युवक दुचाकीवर पोत्यात गुटखा घेऊन जात असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी या युवकांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा ४५ पाकिट किंमत २७००० व सुंगधीत तंबाखू १० पाऊच किंमत ३३०० व पांढऱ्या रंगाची एम.एच. ३७ के १८१६ क्रमांकाची अंदाजे ४०,००० हजार रुपये किमतीची दुचाकी मिळून एकुण ७०३०० रूपयाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई १३ सप्टेंबर रोजी केली. या प्रकरणी आरोपी चेतन राठोड, राजू टोंगळे रा. कवठळ, ता. मंगरूळपीर यांच्यावर कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.