लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : यंदाच्या उन्हाळी हंगामाच्या मध्यंतरीच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रात लागवड केलेली खरबूज, काकडी, टरबुजाची पिके सुकली आणि शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता या पिकांतून उत्पादनाची आशा नसल्याने हताश शेतकºयांनी या पिकांत गुरे चराईसाठी सोडली आहेत. त्याचा फायदा परिसरातील पशूपालकांना मोठा आधार झाला आहे. कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या पुलाच्या खाली अडाण नदीच्या पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरबुज, टरबूज आणि काकडी या फळपिकांची लागवड केली जाते. नदी पात्राच्या गाळपेर क्षेत्रातील या पिकांना नदीपात्रातील पाण्याचाच आधार असतो. त्यापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळतेच शिवाय परिसरातील शेतमजुरांच्या हाताला कामही मिळते. यंदाही या नदीच्या पात्रात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात फळपिकांची लागवड केली. तथापि, यंदा उन्हाळ्याची चाहुल लागताच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रातील शेतकºयांची बहरलेली फळपिके संकटात सापडली. अशावेळी शेतकºयांनी नदीपात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्याचा आधारे कशीबशी पिके वाढविली. त्यापासून जेमतेम उत्पादन झाले; परंतु यातून खर्चही वसुल झाला नाही. आता नदीपात्रातील खड्ड्यांतूनही पिके जगविणे कठीण झाले असून, ही पिके सुकत चालली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पिके जगविण्याचा प्रयत्नच सोडला आणि गुरांच्या चराईसाठी मोकळे रान केले. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी, चाराटंचाईच्या काळात परिसरातील गुरांचे पोट यामुळे भरू लागल्याने पशूपालकांची मोठी समस्याही सुटली आहे. त्यातच या नदीपात्रातील गाळमिश्रीत पाणीही गुरांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडत आहे.
खरबूज-टरबूजांच्या मळ्यात चराईसाठी सोडली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 3:55 PM