शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 4:59 PM

अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एरव्ही दरवर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला राबविल्या जाणाऱ्या गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे यंदा विलंब झाला. दरम्यान, शासनाने २ जून रोजी त्यास मंजूरी दिली असून, अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत.गुरांमधील संसर्गजन्य लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि वराहांना सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोनवेळा तसेच ४ ते ८ महिने वयोगटातील गायींच्या कालवडी व म्हशींच्या पारड्यांना एकवेळा सांसर्गिक गर्भपात प्रतिबंधक लसीकरण केले जाते. त्यानुसार, २०१९-२० या वर्षातील कार्यक्रम ‘लॉकडाऊन’मुळे काहीअंशी लांबणीवर पडला. आता त्यास मंजूरी मिळाली असून अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय; तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नियोजन आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमासंबंधीचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, ३ जून रोजी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रणासाठी लागणाºया लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.- भुवनेश बोरकरसहायक उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम