लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या सात दिवसांपूर्वी एका पेट्रोलपंवर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकच्या क्लीनरचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला, तर ट्रकचालकाचा अहवालही पॉझिटीव्ह आला. यामुळे पेट्रोलपंपधारकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून, ्रकोरोना संसर्गापासून बचावासाठी ते खबरदारी घेत असल्याचे शनिवारी आसेगाव परिसरातील पेट्रोलपंवर दिसून आले.मालेगाव-वाशिम मार्गावरील कूकसा येथील एका पेट्रोलपंवर डिझेल भरणाºया ट्रकच्या चालकाला श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्याला २ मे रोजी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या क्लीनरचा त्याच रात्री मृत्यू झाला आणि त्याच्या संपर्कातील ट्रक ड्रायव्हरचा अहवालही ८ मे रोजी पॉझिटीव्ह आला. या प्रकारामुळे आसेगाव परिसरातील पेट्रोलपंपधारक थेट हाती पैसे न घेता पेट्रोल, डिझेल भरणाºयांना ते डब्यात टाकण्यास सांगून आवश्यक खबरदारी घेत असल्याचे शनिवारी दिसून आले. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरातील धानोरा, बिटोडा भोयरसह इतर काही ठिकाणच्या पेट्रोलपंपवर ही खबरदारी घेण्यात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना’पासून बचावासाठी पेट्रोलपंप धारकांची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:08 PM