लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पोषण माहनिमित्त वाशिम येथील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) प्रियंका गवळी यांनी अनसिंग येथील सहा कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ६० दिवस या बालकांना स्वखर्चातून पोषक आहारही पुरविला जाणार आहे.जिल्ह्यात सध्या पोषण माहनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनसिंग येथे सहा कुपोषित बालके असल्याने या बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी गवळी यांनी पुढाकार घेत कुपोषण संपत नाही; तोपर्यंत या बालकांना दत्तक घेतले. आरोग्याच्या दृष्टिकोनाने आवश्यक ते पौष्टिक घटक असलेले अन्नपदार्थ स्वखर्चातून पुरवित आहेत. ही सहा बालके कुपोषणमुक्त झाल्यानंतर, तालुक्यातील आणखी २१ कुपोषित बालके दत्तक घेण्याचा मानस असल्याचे गवळी यांनी सांगितले. वाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्याचा मानसवाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रारंभीच्या टप्प्यात सहा बालके दत्तक घेण्यात आली. टप्प्याटप्प्याने वाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्याचा मानस गवळी यांनी व्यक्त केला.
‘सीडीपीओ’ने घेतली सहा कुपोषित बालके दत्तक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:37 PM