यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली
वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . गेल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकरी सभा व बीबीएफ तंत्रज्ञान रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी ,सरी-वरंब्यावर सोयाबीन लागवड बीजप्रक्रिया, निंबोळी अर्क तयार करणे असे विविध प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले नरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना व तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप हंगामातील विविध पीक विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीगिरी येथे आयोजित समारोपीय कार्यक्रमात कृषी सहायक भागवत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन या पिकावरील कीड व रोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले ,निंबोळी अर्क तयार करणे , तणनाशक व कीटकनाशक वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले व तसेच पंतप्रधान पीक विमा योजना विषय खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग कपाशी खरीप ज्वारी पेरणी केलेल्या क्षेत्राचा विमा काढण्याचे आव्हान कृषी सहायक भागवत देशमुख यांनी केले
या कार्यक्रमाला शेतकरी बांधव व महिला उपस्थित होते