वाशिम: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची कृषीदिन म्हणून साजरी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार १ जुलै विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यानंतर सरपंच अनिल चव्हाण व मान्यवरांनी कै.वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषिक्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, तसेच सामाजिक योगदानासह त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. विविध ठिकाणी जयंती कार्यक्रमादरम्यानच शासनाच्या सुचनेनुसार कृषीदिनानिमित्त कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बंजारा समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे जयंती सोहळा साजरा केला. यानिमित्त विविध ठिकाणी फळे, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:24 PM
वाशिम: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देमहामानव कै. वसंतराव नाईक यांची कृषीदिन म्हणून साजरी करण्याचे निर्देश आहेत. १ जुलै विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते.यानिमित्त विविध ठिकाणी फळे, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.