नागरिकांच्या आरोग्यावर राष्ट्राचे आरोग्य अवलंबून असते. राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे ज्या राष्ट्रातील नागरिक सुदृढ असतील त्या राष्ट्राची प्रगती निश्चित असते. आरोग्यामध्ये योगसाधनेला अतिशय महत्त्व आहे. यामुळेच भारताच्या पुढाकाराने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. सध्या कोविड या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या नियमाचे पालन होणेही गरजेचे आहे आणि योगही गरजेचा आहे. अशा परिस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाच्या रासेयो पथकाने योग दिनाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे यांच्या नेतृत्वात व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एस. पाथरकर यांच्या मार्गदर्शनात आपापल्या घरी, प्रांगणात योगसाधना करून योग दिन साजरा केला.