कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ होते. मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर, राठोड, तंत्र अधिकारी मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व महिला कृषी सहायकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक कंकाळ यांनी केले. यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व विषद केले. मंडळ कृषी अधिकारी राठोड यांनी महिलांचे अधिकार व कर्तव्य, याविषयी माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून लोखंडे यांनी महिला बचतगटाची वाटचाल याबाबत माहिती दिली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी शासनस्तरावर चालणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक कदम, कृषी सहायक जयश्री मुंडे, कालिंदा मुंडे, वानखेडे, टाकरस, नागमोठे, रामू खोलगडे, वाघ यांनी पुढाकार घेतला.
..................
बॉक्स :
केंद्रीय विद्यालयाकडून ऑनलाईन कार्यक्रम साजरा
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची स्थिती लक्षात घेता, वाशिम येथील केंद्रीय विद्यालयाकडून आॅनलाईन पद्धतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात केंद्रीय विद्यालय संघटन, मुंबईच्या माजी उपायुक्त अरुणा प्रेम भल्ला, प्राचार्य सविता यादव, पोलीस निरीक्षक योगीता भारव्दाज यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अमीतकुमार सैनी यांनी केले. प्राचार्य ए. एच. खान यांनी प्रमुख पाहुण्या महिलांचे स्वागत केले. त्यानंतर संगीत शिक्षक मुकेश राव यांनी महिला सशक्तीकरणावर गीत गायन केले. यावेळी योगीता भारव्दाज यांनी महिला सशक्तीकरण, महिला स्वयंसुरक्षा, महिला सन्मान आदी विषयांवर मार्गदर्शन केले. सविता यादव यांनी स्त्री समानता विषयावर भर देऊन आपले विचार व्यक्त केले. अरुणा प्रेम भल्ला म्हणाल्या की, महिलांनी आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवे. सर्व पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच महिलांचा सन्मान करण्याची शिकवणूक द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.