कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ॲड. भागवत नरवाडे, तर प्रमुख मार्गदर्शक डाॅ. अशिष सिंह होते. या वेळी प्रथम सावित्रीबाई फुले, जिजामाता, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात. जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोनाकाळातील दूत ठरलेल्या आरोग्य कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान या वेळी करण्यात आला. सरपंच ॲड. भागवत नरवाडे यांनी नारीशक्तीचा सन्मान हाच खऱ्या अर्थाने आजच्या जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद करणारा सोहळा असल्याचे सांगितले. तर डाॅ. सिंह यांनी कोरोनाकाळात आरोग्य विभागातील महिलांचे कार्य मोलाचे ठरल्याचा उल्लेख केला. या वेळी उपसरपंच वैशाली मोरे, संदीप मोरे, ज्योती काळे, सीमा नरवाडे, कुंदन सिकवाल, ज्योती रामदास नरवाडे, अनिता नरवाडे, संतोष खरडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:41 AM