क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी दिव्यांग कलावंत चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा यांच्यावतीने प्रबोधनपर गीतांचा संगीतमय कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. चेतन उचितकर आणि त्याच्या सहकारी कलावंतांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला.
अडोळी येथे जयंती साजरी
वाशिम : येथून जवळच असलेल्या अडोळी या गावी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरोना महामारी लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशाचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान हे होते. तर कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून लक्ष्मीबाई पडघान, संध्या पडघान, संजीवनी पडघान ह्या होत्या. सर्वप्रथम राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्क पडघान तर आभार आकाश पडघान यांनी केले.
वाशिम : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या घरीच मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी थोर समाजसुधारक शिक्षणाचे आद्यजनक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त केकतउमरा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी राजा प्रसेनजित अल्पसंख्याक शिक्षण संस्था केकतउमरा अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादुर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
वाशिम : वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.