प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक, त्रिशरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष, महानंदा वाठोरे या होत्या. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून रेखा रवि अंभोरे, प्रमिला शेवाळे, संध्या पंडित यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष शालिग्राम पठाडे, माधव हिवाळे, देवीदास सोनुने, दाजिबा खरात, दगडू हिवाळे, विनोद घुगे, किशोर पंडित, गिरिधर शेजुळ, मोनिका इंगळे, मीना चव्हाण, संगीता पडघान, आम्रपाली पठाडे, जमधाडे, आंनदीबाई पंडित, जया जुमडे, शीतल जुमडे, द्वारकाबाई धांडे, गंगासागर अंभोरे, मंगल जमधाडे, लता धांडे, मालती रमेश वाठोरे, जिजाबाई कळासरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पडघान, प्रास्ताविक मंदा वाघमारे तर ज्योती अंभोरे आभार मानले.
भारतीय बौद्ध महासभेकडून रमाई आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:35 AM