सर्वप्रथम अभिषेक तसेच नित्यनैमित्तिक पूजनविधी पार पडला. त्यानंतर अष्टक आणि आर्यिका शुद्धोहं श्री माताजी यांचे प्रवचन व विदुषी विजयाताई भिसीकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी गुरुकुलचे विश्वस्त राजाभाऊ चवरे, पंडिता विजयाताई भिसीकर व प्रज्ञाताई डोणगावकर यांच्या हस्ते ‘संवाद ज्ञानियांचा’ आणि ‘योगायोग’ या ग्रंथांचे विमोचन करण्यात आले. कारंजा गुरुकुलचे माजी स्नातक स्व.पद्मनाभ जैनी यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या ग्रंथाविषयी चंद्रमोहन शहा, डोणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
स्मृतीदिनानिमित्त दररोज सकाळी सात वाजेपासून अभिषेक, पूजन व शक्ती विधान झाले. दुपारी अडीच ते साडेचार व रात्री सात ते साडेनऊ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत भोरे यांनी आणि संचालन दीपाली डोणगावकर यांनी केले.