- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्टमध्ये पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांच्या यादीवर नजर टाकली तर १६३ पैकी तब्बल १०० ग्रामपंचायतींमध्ये केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची प्रशासक म्हणून वर्णी लागल्याने, या यादीवर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा दिसून येतो.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. गावपातळीवर ग्राम पंचायतच्या निवडणुकीला विशेष महत्व असते. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक हे सर्व शक्ती पणाला लावून उतरत असतात. यंदा कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न तुर्तास भंगले आहे. प्रशासक म्हणून सरकारी कर्मचाºयांची नियुक्ती करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक म्हणून गटशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक ५३ ठिकाणी मुख्याध्यापक तर ४७ ठिकाणी केंद्र प्रमुख हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळणार आहेत. काही केंद्र प्रमुखांना तर प्रशासक म्हणून स्वत:चे गावही मिळाले आहे.
प्रशासक पदावर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:40 AM