लोकमत न्युज नेटवर्कअनसिंग : आघाडी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती दडविल्याचा प्रकार सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेने केल्याचे उघडकीस आले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या यादीत नाव न दिसल्याने शेतकºयांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. सेंट्रल बँके च्या अनसिंग येथील शाखेतून अनसिंग, पिंपळगाव, सोंडा, सापळी, उमरा कापसे, उमरा शमशोद्दीन, पार्डीआसरा व इतर गावातील शेकडो शेतकºयांनी हंगाम २०१५-१६ व त्यापूर्वी पिक कर्ज घेतले होते. या कर्जदार शेतकºयांनी नापिकीमुळे बँकेच्या पीक कर्जाचा भरणा केला नव्हता. दरम्यान, राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने २०१५ -१६ पूर्वी थकीत कर्जदार असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली; परंतु अनसिंग येथील सेंट्रल बँकेच्या अनसिंग येथील तत्कालीन व विद्यमान शाखा व्यवस्थापक व बँकेतील कर्मचाºयांनी या योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १०० पेक्षा जास्त शेतकºयांना या बाबत कोणतीच माहिती दिली नाही. आता राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दोन लाख रुपये पर्यंतचे थकित कृषीकर्ज असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणली. या योजनेच्या यादीत काही शेतकºयांना आपले नाव दिसले नाही. त्यावेळी अनसिंग येथील रहिवासी महिला शेतकरी सारिका विजय गट्टाणी यांनी चौकशी केली. तेव्हा तुमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत असल्यांचे सांगत आता तुम्ही थकीत व्याजाची रक्कम भरण्याचा असा सल्ला शाखा व्यवस्थापकांनी दिला. त्यावरून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांच्या व्याजाचा नाहक भुर्दंडअनसिंग येथील सारिका गट्टाणी यांच्यासह सापळी येथील तात्याराव रायाजी ढगे, भगवान तात्याराव ढगे व इतर शेतकºयांनाही सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी थकित व्याजाची रक्कम भरण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारामुळे अनसिंग व परिसरातील १०० पेक्षा जास्त शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तसेच हे सर्व शेतकरी आधीची कर्जमाफी होऊनही हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये नवीन पिक कर्जापासून वंचित राहिलेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्वच शेतकºयांना त्याची माहिती आणि लाभही देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसारच कर्जमाफीची यादी जाहीर झाली होती. काही शेतकºयांचा याबाबत गैरसमज झाला आहे. ते शेतकरी सध्याच्या कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरतात. त्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. -गणेश जाधव, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, अनसिंग
मी २०१५-१६ मध्ये १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १ लाख ५ हजार ५७० रुपये कर्जमाफी झाली होती. त्याबाबतचा एसएमएसही आला होता. त्यावेळी २ हजार ९१२ रुपये व्याजाची रक्कम भरावी लागणार होती. त्यामुळे मी वारंवार सेंट्रल बँकेच्या शाखेशी संपर्कही केला; परंतु तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसल्याचे शाखाधिकाºयांनी सांगितले होते. -नंदकिशोर नारायण कापसे,शेतकरी, उमरा कापसे