मंगरुळपीर, दि. ५- स्थानिक पंचायत समिती सभागृहात ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी तालुक्याचा शैक्षणिक कारभार समाधानकारक नसल्याची बाब स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची सीईओंनी चांगलीच कानउघाडणी केली.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११९ शाळा असून त्यात दहा केंद्रप्रमुख, २0 मुख्याध्यापकासह मोठय़ा संख्येने शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंंना गुणवत्तापूर्ण व दज्रेदार शिक्षण मिळावे, याकरिता शासन कोट्यधी रुपये खर्च करते; परंतु तरी देखील जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी संख्येची गळती लागत आहे. हा प्रकार थांबून दज्रेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शासनातर्फे केला जातो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळा व विद्यार्थ्यांंंना प्रत्येकी पाच गुणांचे विविध निकष देण्यात आले आहेत; परंतु या निकषानुसार तालुक्यातील ११९ शाळांपैकी केवळ ३९ शाळा प्रगत आहेत; तर तब्बल ८0 शाळा अप्रगत असल्याची गंभीर बाब आजच्या सभेत उघड झाली. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना खडेबोल सुनावले. तसेच शाळांच्या प्रगतीत सुधारणा करण्यासाठी एक महिन्याचा ह्यअल्टीमेटमह्ण दिला. सध्या या उपक्रमांतर्गत तालुकानिहाय आढावा घेण्यात येत असून, इतर तालुक्याच्या तुलनेत मंगरुळपीर तालुका बहुतांशी मागे असल्याची बाब उजागर झाल्याने याबाबत संबंधितांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सभेला सीईओ पाटील यांच्यासह ह्यडायटह्णचे प्रा.नागरे, गटशिक्षणाधिकारी मंजुषा कौसल, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने, गटविकास अधिकारी पी.एस.शेळके, पंचायत समिती सभापती नीलिमा देशमुख यांच्यासह केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.
‘सीईओं’नी घेतला शिक्षकांचा वर्ग!
By admin | Published: January 06, 2017 2:22 AM