वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि त्याअंतर्गत सहा पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील सर्व पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेले आहेत. पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रात जवळपास दोन लाख पात्र व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने करावे, पोटनिवडणूक क्षेत्रात निवडणूक कामकाज करणारे अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींची तसेच उमेदवार व त्यांचा प्रचार करणाऱ्या पात्र व्यक्तींचे प्राधान्याने नियोजन करून लसीकरण करावे, अशाही सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात दैनंदिन सरासरी पाच ते सात हजारादरम्यान लसीकरण होत आहे. ११ दिवसात दोन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी दैनंदिन सरासरी १८ हजाराच्या आसपास लसीकरण होणे अपेक्षित आहे. उपलब्ध लसीचा साठा बघता दैनंदिन १८ हजार नागरिकांचे लसीकरण तूर्तास तरी आव्हानात्मकच ठरणारे दिसत आहे.
११ दिवसात दोन लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:26 AM