मालेगाव (जि. वाशिम), दि. २३ : साधारण दीड वर्षांंंंंपूर्वी अस्तित्वात आलेल्या मालेगाव नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून प्रारंभी तहसीलदार सोनाली मेटकरी यानी कारभार सांभाळला. त्यानंतर रिसोडचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याकडे ही सूत्रे सोपविण्यात आली. आता मात्र गणेश पांडे नामक कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले असून त्यांच्यापुढे मालेगावातील विविध समस्या सोडविण्याचे आव्हान असणार आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरात अनेक समस्या ह्यआह्ण वासून उभ्या आहेत. बेकायदा बांधकाम, विविध ठिकाणी लावलेले नियमबाह्य शुभेच्छा फलक, स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, ग्रामपंचायतच्या कार्यकाळात नियमबाह्य पद्धतीने लाटलेले घरकूल, रस्त्यांवरील अतिक्रमण, आदी प्रश्न सद्या ऐरणीवर आले आहेत. यासह शहरातील मुख्य मार्गांंंंंवर वाहतुक विस्कळित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एकूणच या सर्व समस्या निकाली काढण्याकडे नव्या मुख्याधिकार्यांना लक्ष पुरवावे लागणार आहे. मालेगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची सूत्र सांभाळायला आपणास काहीच दिवसाचा अवधी झाला आहे. यादरम्यान शहरातील विविध समस्यांची माहिती जाणून घेत आहे. नागरी समस्यांकडे विशेष लक्ष पुरवून त्या सोडविण्याकडे आपला विशेष कटाक्ष असेल. विकासात्मक कामासाठी नागरिकांनी देखील नगर पंचायतीला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.- गणेश पांडेमुख्याधिकारी, मालेगाव न.पं.
समस्या सोडविण्याचे नव्या मुख्याधिका-यांसमोर आव्हान!
By admin | Published: August 23, 2016 11:44 PM