मालेगाव तालुक्यात पांगरी कुटे, डोंगरकिन्ही, जऊळका, उमरदरी, बोराळा शिरसाळा, वरदडी बुद्रुक, उमरदरी बुद्रुक, उमरदरी, डही, कळंबेश्वर, एकांबा, करंजी, डोंगरकिनी, जऊळका रेल्वे, खिर्डा आदी ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले असून ढोरखेडा वाकळवडी वसारी राजुरा शिरपूर मेडशी येथे सत्ता कायम राखण्यासाठी यश मिळाले आहे. चिवरामध्ये गणेश उंडाळ यांच्या पॅनलने आठ जागा पटकाविल्या. आ अमित झनक यांचे समर्थक सुरेश शिंदे यांच्या पॅनलचा पराभव केला. कळमेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसूदन वानखेडे यांनी आठ सदस्य निवडून आणले. स्मार्ट ग्राम ढोरखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव मिटकरी यांनी चार जागा आणून सत्ता स्थापन केली. तिवळी येथे महाविकास आघाडीने पूर्ण सत्ता स्थापन केली. वसारी येथे महाविकास आघाडी जि.प. सदस्य बेबीताई इंगोले, माजी जि.प. सदस्य उर्मिला लादे, माजी पं.स. सदस्य यमुनाबाई जाधव यांनी मिळून सहा सदस्य अविरोध आणून उर्वरित चार सदस्य निवडून आणले. एकंबा येथे वसंतराव गवळी यांच्या नेतृत्वाखाली तीन जागा विजयी झाल्या, पाच सदस्य अविरोध आले. यात मा जि.प. सदस्य विकास गवळी यांच्या पॅनलचा पराभव केला. वाकळवाडी येथे माजी सरपंच राजू व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली पाच जागांवर विजय मिळविला आणि पुन्हा सत्ता काबीज केली. मोठ्या ग्रा.पं.मधील शिरपूरला अशोक अंभोरे यांच्या क्रांती पॅनलने पुन्हा सत्ता काबीज केली. मेडशीमध्ये गनी भाई यांच्या शेतकरी शेतमजूर पॅनलने १० जागेवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. तर जऊळकामध्ये लालाजी चव्हाण यांनी सहा जागेवर विजय मिळवून सत्तांत्तर घडवून आणले. मुंगळा येथे सत्ता परिवर्तन झाले. अनेक नवीन चेहरे निवडून आल्याचे साेमवारी लागलेल्या निकालावरून दिसून येत आहे.
मालेगावात सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:41 AM