लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभ-यावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.वाशिम जिल्हयात गत पंधरा दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल पडत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी उन्ह पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीचउत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. अनेक शेतक-यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभºयांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून अगोदरच सोयाबीन, तूर , हरभरा या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतक-यांना या अस्मानी संकटामुळे चिंतेत टाकले आहे. या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांचेही मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकºयांना तुरीची सोंगणी व काढणीला लागणारा खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.
शेतक-यांची धडपड
- वातावरणातील बदलामुळे हरभरावर पडत असलेल्या अळयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी धावपळ सुरु केली आहे. कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करुन पीके वाचविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात शेतकरी माहिती घेतांना दिसून येत आहेत. हातचे पीक न जाण्यासाठी धडपड दिसून येत आहे.
- गत आठ दिवसांपासून पडत असलेली थंडी गव्हाला पोषक ठरत असल्याने गहू उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकºयांनी तूर व हरभरा सुध्दा पेरला असल्याने त्याचे नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
- शेतक-यांवर वातावरणातील बदलामुळे उदभवलेले संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतात जावून मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
- तूर उत्पादक शेतक-यांना लावलेला खर्च ही येणाºया उत्पादनातून होणार नसल्यासने अनेक शेतकरी पुढील नियोजनाच्या चिंतेत आहेत.
वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करुन शेतकºयांना संकटातून काढण्याचा मार्ग सांगावा व तसे मार्गदर्शनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. - गणेश इरतकर, शेतकरी