वाशिम : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मानोरा येथील उपअभियंता या पदाचा प्रभार ज्येष्ठाला डावलून कनिष्ठ अभियंत्यांकडे सोपविण्यात आल्याने शासकीय नियमाची पुन्हा एकदा पायमल्ली झाल्याने जिल्हा परिषद चर्चेत आली आहे. दरम्यान, हा प्रकार तातडीने थांबवा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी दिल्याने, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मानोरा येथील उपअभियंता एस.एम.घाडगे हे नियत वयोमानाने ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. नियमीत उपअभियंता हे पद शासनाकडून भरण्यात आले नसल्याने तेथील कार्यरत सेवाजेष्ठ सहायक अभियंता/शाखा अभियंता संवर्गातील कर्मचाºयांमधून अतिरीक्त प्रभार देऊन कामकाज सुरळीत चालविणे आवश्यक होते. मानोरा येथे सेवाज्येष्ठ सहायक अभियंता श्रेणी -दोनचे अभियंता उपलब्ध असताना नियमानुसार त्यांच्याकडे प्रभार सोपविणे अपेक्षीत आहे. मात्र, सेवाज्येष्ठ अभियंत्यांना डावलून त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी कनिष्ठ असलेल्या शाखा अभियंत्यांकडे प्रभार सोपविण्यात आला. शासकीय नियम डावलून कनिष्ठ अभियंत्यांकडे प्रभार सोपवून जिल्हा परिषद प्रशासनाने नेमके काय साध्य केले? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी उपस्थित केला. शासन नियमाची अंमलबजावणी करून घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच जर नियमाची पायमल्ली होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहावे? असा प्रश्नही ठाकरे यांनी मांडला असून, नियमानुसार सेवाज्येष्ठ सहाय्यक अभियंत्यांकडे प्रभार सोपविण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मानोरा येथील उपअभियंता पदाचा प्रभार नेमका कुणाकडे दिला, याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर सविस्तर सांगता येईल.- डॉ. शाम गाभणेअध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम.
ज्येष्ठाला डावलून कनिष्ठाकडे सोपविला उपअभियंता पदाचा प्रभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 7:49 PM
Washim News : सेवाज्येष्ठ अभियंत्यांना डावलून त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी कनिष्ठ असलेल्या शाखा अभियंत्यांकडे प्रभार सोपविण्यात आला.
ठळक मुद्देग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रकार वाशिम जिल्हा परिषद पुन्हा चर्चेत