या वेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी पद्मश्री नामदेव कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच ५ लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
या वेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांच्या साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला होता. तसेच शासनाच्या वतीने त्यांच्या घरासाठी ५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांना धनादेश प्रदान करण्यात येत आहे. यानिमित्ताने पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे, असे मत पालकमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केले.