लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे (वाशिम) : वाशिम जिल्हय़ात असलेल्या अमानवाडी रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या रेल्वेमध्ये पाणी भरण्याचे काम बाल कामगारांकडून केले जात असल्याचे २९ जुलैला आढळून आले. या संदर्भात मात्र असा कोणताच प्रकार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.अमानवाडी रेल्वे स्थानकावर अनेक रेल्वे १५ ते २0 मिनिटे थांबून रेल्वेत पाणी भरण्यात येते. शनिवारी अजमेर- हैदराबाद ही रेल्वे दुपारी ४ वाजता अमानवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यामध्ये बाल कामगाराच्या हातून पाणी भरताना आढळून आले. या ठिकाणी या कार्यासाठी रेल्वे कर्मचार्याची नियुक्ती असल्याची माहिती आहे. अमानवाडी रेल्वे स्थानकावर शनिवार, गुरुवारी अजमेर- हैदराबाद, तर सोमवारी यशवंतपूर - इंदूर गाड्या थांबतात. अमानवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वेत पाणी भरण्यासाठी विशेष व्यवस्था असल्याने या गाड्या येथे थांबतात. यावेळी बालकामगारांकडून यामध्ये पाणी भरल्या जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या कामाकरिता अकोला येथून कर्मचारी येत असल्याची माहिती आहे. शनिवारी अमानवाडी रेल्वे स्टेशनवर गाडी नंबर १२७१९ जयपूर- अजमेर- हैदराबाद येथे रेल्वेत पाणी भरताना बाल कामगार आढळून आला.
रेल्वे स्थानकावर पाणी भरण्यासाठी बाल कामगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:10 AM
जऊळका रेल्वे (वाशिम) : वाशिम जिल्हय़ात असलेल्या अमानवाडी रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या रेल्वेमध्ये पाणी भरण्याचे काम बाल कामगारांकडून केले जात असल्याचे २९ जुलैला आढळून आले. या संदर्भात मात्र असा कोणताच प्रकार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ठळक मुद्देअमानवाडी रेल्वे स्थानकावरील प्रकारबालकामगारांकरवी भरले जाते रेल्वे गाड्यांमध्ये पाणी२९ जुलै रोजी आढळून आला प्रकार