लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरण संतुलन राखण्यास मदत व्हावी या हेतुने वाशिम शहरातील एस.एम.सी. इंग्लीश स्कुलने सौर उर्जा प्रकल्प घेऊन विज निर्मीती केली व पैशाच्या बचतीसहच पर्यावरण संतुलन राखण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. तीन वर्षापूवी हा प्रकल्प उभारुन लाखो रुपयांची बचत झाल्याचा दावा संस्थेच्यावतिने करण्यात येत आहे. तसेच गत दहा वर्षापासून सौर उर्जेबाबत जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य या शिक्षण संस्थेच्यावतिने चिमुकल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत असून ते आजही अविरत दिसून येत आहे.सध्याच्या दैनंदिन जीवनात वीजेच्या अती वापरामुळे निर्माण होणारा तुटवडा व त्यातुनच निर्माण होणारे विजेचे भारनियमन या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा व सौर चुलींचा वापर केल्यास फायद्याचे ठरणार आहे. भविष्यामध्ये इंधनाचा तुटवडा व वीजेचे संकट दिवसेंदिवस वाढणार आहे. सदर संकट लक्षात घेता आतापासूनच उर्जा संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर आवश्यक असल्याचे पाहून तीन वर्षापूवी हा प्रकल्प शाळेत तयार करुन पर्यावरण रक्षणाचे कार्य या संस्थेच्यावतिने झाले असे म्हटल्यास वावगे ठरु नये. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी या संस्थेतील राष्टÑीय हरित सेनेच्यावतिने प्राचार्य मिना उबगडे व शिक्षक अभिजित जोशी यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी जनजागृती केल्या जात आहे. गत दहा वर्षापासून ही जनजागृती केली जात आहे. (प्रतिनिधी)
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सरसावले चिमुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 3:39 PM