वाशिम : स्थानिक विद्याभारती प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी व पालखीची सुरुवात शाळेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत करण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर तसेच पर्यावरण जागृती विषयक घोष वाक्य लेझीम, टाळ व मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण केले तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनीना वारकरी पोशाखात होते. दिंंडी व पालखी या कार्यक्रमामध्ये इंगळे ,उपविभागीय कृषी अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब लाव्हरे, उपाध्यक्ष रामचंद्र मिटकरी, शाळेचे अध्यक्ष सुरेशराव मिटकरी, शाळेचे संचालक नंदकिशोर मिटकरी, गंगावणे, संचालीका भारतीताई मिटकरी उपस्थित होते. हिंदी शाळेत परत आल्यानंतर विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक सुमित मिटकरी , नितेश मिटकरी, प्रियंका विभुते, विजय गोटे, प्रतिभा पऱ्हाते, संगीता डहाळे, धनंजय आबटकर, मयुर वाडेकर, पवन निमके,प्रविण बाजड, किर्ती कुलकर्णी, भारती तांबेकर, महेश लावरवार, ज्योती सिरसाट, वृषाली नवलकर, अनिल भिसडे, जयश्री भोयर, अनिता महाले, आरती रावले ,दिपक भिसडे इत्यांदीनी परिश्रम घेतले.
आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी काढली दिंडी
By admin | Published: July 05, 2017 1:42 PM