लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : कृषी विभागातर्फे शेतकरी चर्चासत्र घेतले जात असून, अनसिंगपासून जवळच असलेल्या एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतकºयांना पेरणीसंदर्भात तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी शेतकरी चर्चासत्र घेतले जात आहे. एकांबा येथेदेखील चर्चासत्र घेण्यात आले. एकांबा येथे २५ जून रोजी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना आगामी पेरणीविषयी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीनची लागवड ही सरी-वरंबा, रुंद सरी वरंबा पद्धतीने करण्यासाठी आणि तुरीच्या पिकासाठी कमी कालावधीचे वान घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. बीज प्रक्रिया करणे, उगवणशक्ती तपासणे, इत्यादीबाबत माहिती दिली. कृषी विभागातर्फे गावातील २५ शेतकºयांची ईश्वरचिठ्ठीने निवड करून प्रति शेतकरी एक एकरासाठी लागणारे उडीद बियाणे देण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची पात्र शेतकरी पात्र कुटुंबाने आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक याची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे जमा करावे, असे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत आणि कृषी सहाय्यक विजय ढवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विष्णू काटेकर, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर बेंद्रे ,किसन कोरडे, ज्ञानेश्वर काटेकर, विठ्ठल वाबळे आणि समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.
उडदाच्या बियाण्यांसाठी ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 6:22 PM