वाशिम : यावर्षीपासून प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईनद्वारे नामांकन अर्ज भरता येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जुलै रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या प्रशिक्षण वर्ग घेतला. यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी बिबे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार राहुल वानखडे, नीलेश मडके आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया करण्याचे धोरण राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक तसेच एका ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्न ऑनलाईन भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. पुढे बोलताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, ऑनलाईन नामनिर्देशन पत्ने राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. १३ जुलै २0१५ पासून नामनिर्देशन पत्ने स्वीकारली जाणार असून, त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील यंत्नणा सज्ज झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशनपत्न भरल्यानंतर त्याची प्रिंट स्वरूपातील एक प्रत २४ तासांच्या आत संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकार्याकडे जमा करणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अशा प्रकारची नामनिर्देशनपत्ने स्वीकारताना त्यावर उमेदवाराची स्वाक्षरी असल्याची खात्नी करावी, तसेच या नामनिर्देशन पत्नांसोबत जोडण्यात येणार्या विवरण पत्नांमधील सर्व रकाने उमेदवारांनी भरणे बंधनकारक आहे. यापैकी कोणताही रकाना रिक्त असल्यास संबधित निवडणूक निर्णय अधिकार्यांनी याबाबत उमेदवारांना लेखी सूचना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले.
ऑनलाईन नामनिर्देशनपत्न भरण्यावर मंथन
By admin | Published: July 13, 2015 2:08 AM