लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील मौजे आसोला खुर्दसह परिसरात रात्रीच्यावेळी विज गुल होण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.मौजे आसोला खुर्द, हातोली, आमदरी, शिवणी, वसंतनगर तांडा, आदि गावामध्ये १२ व १३ जुन रोजी मध्यरात्री दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला. एकवेळ गुल झालेली विज दुसर्या दिवशी दुपारीच येत असल्याने ग्रामस्थांना रात्र काळोख्यात काढण्याची पाळी आली. विजेच्या लपंडावामुळे डांस, मच्छर, आदिंचा सामना करावा लागत आहे. आधी पावसाळयाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापुर्वी विज वितरण कंपनीने लोंबकलेच्या तारा व झाडे आदि कामे न केल्यामुहे विज गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विज वितरण कंपनीने दखल घेवुन अवेळी मध्यरात्री दरम्यान खंडीत होणारा विज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By admin | Published: June 17, 2017 7:37 PM