लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम येथे २८ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता नागरिकांनी १५ जुलै २०१९ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात आपल्या तक्रारी व निवेदने सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.समाधान शिबिरासाठी प्राप्त झालेल्या तक्रारी तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागांकडे पाठविल्या जातील. त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करून ३१ जुलै २०१९ पर्यंत अंतिम अहवाल तयार करावयाचा आहे. २ आॅगस्ट रोजी विभागनिहाय एकत्रित टिप्पणी सादर केली जाणार आहे. या अनुषंगाने वाशिम येथे जिल्हास्तरीय समाधान शिबिर २८ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. नागरिकांनी १५ जुलैपर्यंत आपल्या समस्या, तक्रारीविषयीची निवेदने संबंधित तहसील कार्यालयात सादर करावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाने केले. या तक्रारींचा निपटारा केला जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचा होणार निपटारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 2:37 PM