मागील आठवड्यात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियम घालून दिले आहेत. गतवर्षापासून कोरोना धुमाकूळ घालत आहे. यात अनेकांचे प्राणसुद्धा गेले आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी बाबी आवश्यक आहेत. मात्र, तरीसुद्धा अनेकजण हे नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापरण्यापासूनच्या सूचना नागरिकांना द्याव्या लागत आहेत. जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत ६०३ ॲक्टिव्ह रुग्ण होते. तर दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. मात्र, अनेकजण नियम पाळत नसल्याने प्रशासनाला पुन्हा संचारबंदी लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे गर्दी टाळून मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना नियमांना नागरिकांकडून बगल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:56 AM