ग्रामीण भागात अवैधरीत्या पेट्रोल अव्वाच्या सव्वा भावाने विकले जात असल्यामुळे वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे.
या वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे वाहन चालविणेसुद्धा अवघड झाले आहे. जे पेट्रोल पंपावर ९४ रुपये लिटर विकले जाते, त्याच पेट्रोलची अवैधरीत्या विक्री करून लिटरमागे १६ रुपये जास्त घेतले जात आहे. ज्या परिसरात पेट्रोल पंप नाहीत, अशा ठिकाणी नाइलाजास्तव वाहनधारकांना अवैधरीत्या पेट्रोल अव्वाच्या सव्वा भावाने विकत घ्यावे लागत आहे.
त्यामुळे या अवैधरीत्या विकल्या जाणाऱ्या पेट्रोलवर बंदी आणून वाहनधारकांची होणारी लूट कोण थांबवेल, असा प्रश्न ग्रामीण भागातील वाहनधारक करत आहेत.