वाशिम शहरातील गुलाटी ले-आउट, सिव्हिल लाइन्स भाग, तसेच अकाेला रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ नगरात गत काही दिवसांपासून चाेर येत असून, वाहनांची तोडफोड, कुंपण भिंतीवरून घरात शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या भागात अनेकांच्या घरासमाेर सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने हे चाेरटे यामध्ये दिसून येत आहेत. काेणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता श्री स्वामी समर्थनगरातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेऊन रात्रीच्या वेळी काॅलनीतील नागरिकांनी आळीपाळीने गस्त देण्याचे नियाेजन करण्यात आले. गत ५ दिवसांपासून गस्त देण्यात येत आहे. कामाची व्यस्तता पाहता, या भागात चाैकीदार ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, परंतु पाेलीस प्रशासनानेही रात्री गस्त या भागात वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी श्री स्वामी समर्थनगरातील नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांची भेट घेऊन घडत असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. काॅलनीवासियांनी निवेदन देतेवेळी काेराेना नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.
शिवा ठाकरे यांनीही श्री स्वामी समर्थनगरासह परिसरात रात्रीची पेट्राेलिंग वाढविण्याचे आश्वासन यावेळी श्री स्वामी समर्थ नगरातील नागरिकांना दिले. यामुळे काॅलनीवासीयांना दिलासा मिळाला.