जुनी आययुडीपी भागातील नागरिकांना जवळपास लसीकरण नसल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. म्हणून या भागातील नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठौड़ यांच्याकडे विशेष मागणी करून शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये २९ जूनपासून नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या भागात लसीकरण केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी ॲड. विनोद खंडेलवाल यांचे कौतुक केले. हे लसीकरण केंद्र सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमित सुरू राहणार असून, लसीकरण केंद्रावर नागरिकांना बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे केंद्रावर नागरिकांना पाऊस लागू नये म्हणून खास शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण कार्यक्रमात एनयुएचएमचे डॉ. भगत, कुटे व त्याचे कर्मचारी यांनी नागरिकांना लस दिली. यावेळी नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते-पाटील, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, राजू धोंगडे, अमोल मापारी, सतीश खंडारे, समीर कुरेशी व या भागातील नागरिक उपस्थित होते.
..........
ॲड. खंडेलवाल यांच्या कार्याचे काैतुक
शहरातील आययुडीपी जवळपास काेठेही लसीकरणाची व्यवस्था नसल्याने या भागातील नगरसेवक ॲड. खंडेलवाल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून या परिसरात लसीकरणाची व्यवस्था करून दिल्याने या भागातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे काैतुक केले.