कारंजा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम. एच. हक यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सहन्यायधीश के. के. चौधरी, विधीज्ज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. ए. ए. खंडागळे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. डी. के. पिंजरकर, ॲड. विजय छल्लानी, ॲड. दिलीप वाडेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कायदेविषयक शिबिरात ॲड. नीलेश कानकिरड यांनी कामगार कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच न्यायाधीश के. के. चौधरी यांनी निर्वाह भत्ता व ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांच्या कल्याणकारी कायदे, तसेच न्यायाधीश एम. एच. हक यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य याबद्दल बोलताना नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्याचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन ॲड. अनिता राठोड यांनी केले, तर आभार ॲड. रवी रामटेके यांनी मानले. कारंजा विधीज्ज्ञ मंडळाचे पदाधिकारी, महिला विधीज्ज्ञ मंडळी सदस्य, कर्मचारी वृंद व कारंजा परिसरातील पक्षकार मंडळी उपस्थित होती.