दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आदी उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जातात. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना डबल मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढल्याने आपसूकच विक्रीतही वाढ झाली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिकही बिनधास्त झाले असून, आता सिंगल मास्क वापरण्याकडेही अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. सॅनिटायझरच्या वापरात तर फारच घट आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत जवळपास ४० टक्के घट झाल्याचे सांगितले जात आहे.
000
सॅनिटायझरच्या किमतीतही घट !
दुसऱ्या लाटेत सॅनिटायझरचा वापर वाढल्याने अर्ध्या लीटर सॅनिटायझरच्या बॉटलसाठी (स्प्रे) २०० ते ३०० रुपयादरम्यान दर होते. पाच लीटरच्या कॅनसाठी ६०० ते ११०० रुपयांदरम्यान दर आकारले जात होते. आता कोरोनाची लाट ओसरत असल्याने सॅनिटायझरची मागणी घटली. परिणामी, किमतीदेखील गडगडल्याचे दिसून येते. अर्धा लीटर बॉटलसाठी (स्प्रे) १५० ते २०० रुपये, पाच लीटर कॅनसाठी ३०० ते ६०० रुपये आकारले जातात.
००
मास्कच्या विक्रीतील घट : ३५ टक्के
सॅनिटायझरच्या विक्रीतील घट : ४५ टक्के
००००००००००००
कोट बॉक्स
दुसऱ्या लाटेत मास्क व सॅनिटायझरची विक्री वाढली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत घट झाली आहे.
- हुकूम पाटील तुर्के, संचालक, मेडिकल स्टोअर्स, वाशिम