कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व तहसीलदार धीरज मांजरे तसेच मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, विनय वानखडे यांच्या मार्गदर्शनात शहरात कोरोना प्रतिबंधक पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांच्या माध्यमातून शहरात लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात येत असून, नागरिक मास्कचा वापर करतात का, तसेच वेळेवर दुकाने बंद करतात का तसेच शहरातील सर्व मंगल कार्यालयात नियमानुसार विवाह सोहळे होतात का, तेथे वऱ्हाडी मंडळी मास्कचा वापर करतात का, त्या ठिकाणी सॅनिटायझर व इतर तपासणीचे साहित्य आहे की नाही, याची तपासणी या पथकांकडून केली जात आहे. यात नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड त्यांच्याकडून आकारला जात आहे. यात गत दोन दिवसात या पथकांच्या माध्यमातून २० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. तसेच सर्व मंगल कार्यालयांना नोटीस देण्यात आली. या पथकात आरोग्य विभागातील राहुल सांवत, संजय धंडेवल, रवी जयदे, सुधीर चकोर, नेमचंद धिके, विजय सावते आदींचा सहभाग आहे. शहरात या पथकामुळे नागरिक नियमाचे पालन करीत आहेत.
काेट: शहरातील सर्व नागरिकांनी नियमाचे पालन करावे यासाठी वाहनाच्या आधारे पथकांकडून जनजागृृती करण्यात येत आहे, तसेच ज्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येतआहे.
राहुल सावंत,
कर्मचारी, न.प. कारंजा